मुलीचा पाळणा
पहिल्या दिवशी:
पहिल्या दिवशी जन्मली कन्या,घरभर पसरली आनंदछाया,लक्ष्मीच्या रूपाने आली माया,जो बाळा जो जो गं जो…
दुसऱ्या दिवशी:
दुसऱ्या दिवशी आई म्हणे,माझे लेकरू गोड किती गं,जीवापाड मी जपीन तुला गं,जो बाळा जो जो गं जो…
तिसऱ्या दिवशी:
तिसऱ्या दिवशी बाबा म्हणती,भाग्य उजळले माझे आज,लेकीमुळे लाभला साज,जो बाळा जो जो गं जो…
चौथ्या दिवशी:
चौथ्या दिवशी आजी म्हणे,सोन्याहून गोड माझी नात,सुखी राहो तिची प्रत्येक वाट,जो बाळा जो जो गं जो…
पाचव्या दिवशी:
पाचव्या दिवशी आजोबा आले,मायेने तिला कुशीत घेतले,आशीर्वादांचे फुल उधळले,जो बाळा जो जो गं जो…
सहाव्या दिवशी:
सहाव्या दिवशी आत्या आली,बांगड्या, पैंजण घेऊन आली,लेकीला प्रेमाने सजवू लागली,जो बाळा जो जो गं जो…
सातव्या दिवशी:
सातव्या दिवशी मावशी आली,झबले, टोपडे भेटी आणली,भाचीला घेऊन खेळू लागली,जो बाळा जो जो गं जो…
आठव्या दिवशी:
आठव्या दिवशी मामा आला,खाऊ, खेळणी घेऊन आला,भाचीला पाहून हर्षला,जो बाळा जो जो गं जो…
नवव्या दिवशी:
नवव्या दिवशी नाते जमले,लेकीभोवती सारे रमले,कौतुकाने घर भरून गेले,जो बाळा जो जो गं जो…
दहाव्या दिवशी:
दहाव्या दिवशी आला पाळणा,रंगीबेरंगी त्यावर खेळणा,झुलता झुलता लागे डुलणा,जो बाळा जो जो गं जो…
अकराव्या दिवशी:
अकराव्या दिवशी पाहुणे आले,लेकीसाठी आशीर्वाद घेऊन आले,आनंदाने घर दुमदुमले,जो बाळा जो जो गं जो…
बाराव्या दिवशी:
बाराव्या दिवशी बारसे झाले,कुंकू-काजळ तिला लावले,गोड नाव सारे मिळून ठेवले,जो बाळा जो जो गं जो…
शेवटचे कडवे
कुलस्वामिनीचे आशीर्वाद लाभो,ज्ञान, गुण, कीर्ती लाभो,सुखाने आयुष्य फुलून जावो,नाव '...' ऐका मंडळीजो बाळा जो जो गं जो…
मुलीचा पाळणा — गीत २
ध्रुवपद
लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो
पहिल्या दिवशी:
पहिल्या दिवशी आली लक्ष्मीधन धान्याची नसणार कमीलेकीला माझ्या आशिष देईजो बाळा जो जो गं जो
दुसऱ्या दिवशी:
दुसऱ्या दिवशी सरस्वती माताविद्या बुद्धी ची अगाध दातावरदान देई गं माझ्या लेकीलाजो बाळा जो जो गं जो
तिसऱ्या दिवशी:
तिसऱ्या दिवशी पार्वती वासशक्ती रूपाचे पूजन खासलेकीला माझ्या दे आशिरर्वादजो बाळा जो जो गं जो
चौथ्या दिवशी:
चौथ्या दिवशी रखुमाई देवीकर कटेवरी पाय विटेवरीपंढरपूरातून ठेव गं दृष्टीजो बाळा जो जो गं जो
पाचव्या दिवशी:
पाचव्या दिवशी पाचवी कराकार्ल्याहून आली देवी एकवीराधैर्याचे दान दे गं बाळालाजो बाळा जो जो गं जो
सहाव्या दिवशी:
सहाव्या दिवशी पाळणा गातामाहूर हून आली रेणुका माताशक्ती चे दान दे गं लेकीलाजो बाळा जो जो गं जो
सातव्या दिवशी:
सातव्या दिवशी पाणी झाडालासप्तश्रृंगी देवी वणी गडालाप्रेमाने पाही माझ्या बाळालाजो बाळा जो जो गं जो
आठव्या दिवशी:
आठव्या दिवशी घाई हो झालीकोल्हापूराची लक्ष्मी आलीमाझ्या लेकीला समृद्धी देईजो बाळा जो जो गं जो
नवव्या दिवशी:
नवव्या दिवशी फुलांचा सडामुंबादेवीची आठवण काढाआशीर्वाद दे गं माझ्या लेकीलाजो बाळा जो जो गं जो
दहाव्या दिवशी:
दहाव्या दिवशी मांढरगावातकाळूबाई ला धाडा निरोपबाळाला माझ्या दीर्घ आयुष्यजो बाळा जो जो गं जो
अकराव्या दिवशी:
अकराव्या दिवशी पाळणा सजलाचण्या घुगऱ्यांचा खाऊ हि केलाबारशा ला बोलवा सर्व देवींनाजो बाळा जो जो गं जो
बाराव्या दिवशी:
बाराव्या दिवशी बोलवा माळीकरा आरास लावून केळीनाव '...' ऐका मंडळीजो बाळा जो जो गं जो
हलके हलके जोजवा — गीत ३
ध्रुवपद
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा होहलके हलके जोजवा जोजवा जोजवा
कडवे १
सजली गं मऊमऊ मखमालीची शैय्यासजली गं मऊमऊ मखमालीची शैय्यानिजली गं बाळाची गोरी गोरी कायानिजली गं बाळाची गोरी गोरी कायाबाळ रुपडे देवाचे भुलविते लोचनापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा
कडवे २
कुर्रर करा कानात हळूच भेटा गंकुर्रर करा कानात हळूच भेटा गंबारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गंबारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा गंहो आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा
शेवटचे ध्रुवपद
हलके हलके जोजवा बाळाचा पाळणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणापाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणाहो हलके हलके जोजवा जोजवा जोजवा