मुलीचा पाळणा

पहिल्या दिवशी:

पहिल्या दिवशी जन्मली कन्या,घरभर पसरली आनंदछाया,लक्ष्मीच्या रूपाने आली माया,जो बाळा जो, जो रे जो…

दुसऱ्या दिवशी:

दुसऱ्या दिवशी आई म्हणे,माझे लेकरू गोड किती रे,जीवापाड मी जपीन तुला रे,जो बाळा जो, जो रे जो…

तिसऱ्या दिवशी:

तिसऱ्या दिवशी बाबा म्हणती,भाग्य उजळले माझे आज,लेकीमुळे लाभला साज,जो बाळा जो, जो रे जो…

चौथ्या दिवशी:

चौथ्या दिवशी आजी म्हणे,सोन्याहून गोड माझी नात,सुखी राहो तिची प्रत्येक वाट,जो बाळा जो, जो रे जो…

पाचव्या दिवशी:

पाचव्या दिवशी आजोबा आले,मायेने तिला कुशीत घेतले,आशीर्वादांचे फुल उधळले,जो बाळा जो, जो रे जो…

सहाव्या दिवशी:

सहाव्या दिवशी आत्या आली,बांगड्या, पैंजण घेऊन आली,लेकीला प्रेमाने सजवू लागली,जो बाळा जो, जो रे जो…

सातव्या दिवशी:

सातव्या दिवशी मावशी आली,झबले, टोपडे भेटी आणली,भाचीला घेऊन खेळू लागली,जो बाळा जो, जो रे जो…

आठव्या दिवशी:

आठव्या दिवशी मामा आला,खाऊ, खेळणी घेऊन आला,भाचीला पाहून हर्षला,जो बाळा जो, जो रे जो…

नवव्या दिवशी:

नवव्या दिवशी नाते जमले,लेकीभोवती सारे रमले,कौतुकाने घर भरून गेले,जो बाळा जो, जो रे जो…

दहाव्या दिवशी:

दहाव्या दिवशी आला पाळणा,रंगीबेरंगी त्यावर खेळणा,झुलता झुलता लागे डुलणा,जो बाळा जो, जो रे जो…

अकराव्या दिवशी:

अकराव्या दिवशी पाहुणे आले,लेकीसाठी आशीर्वाद घेऊन आले,आनंदाने घर दुमदुमले,जो बाळा जो, जो रे जो…

बाराव्या दिवशी:

बाराव्या दिवशी बारसे झाले,कुंकू-काजळ तिला लावले,गोड नाव सारे मिळून ठेवले,जो बाळा जो, जो रे जो…

शेवटचे कडवे

कुलस्वामिनीचे आशीर्वाद लाभो,ज्ञान, गुण, कीर्ती लाभो,सुखाने आयुष्य फुलून जावो,जो बाळा जो, जो रे जो…

मुलीचा पाळणा — गीत २

ध्रुवपद

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे १

पहिल्या दिवशी आली लक्ष्मीधन धान्याची नसणार कमीलेकीला माझ्या आशिष देई || १ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे २

दुसऱ्या दिवशी सरस्वती माताविद्या बुद्धी ची अगाध दातावरदान देई गं माझ्या लेकीला || २ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ३

तिसऱ्या दिवशी पार्वती वासशक्ती रूपाचे पूजन खासलेकीला माझ्या दे आशिरर्वाद || ३ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ४

चौथ्या दिवशी रखुमाई देवीकर कटेवरी पाय विटेवरीपंढरपूरातून ठेव गं दृष्टी || ४ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ५

पाचव्या दिवशी पाचवी कराकार्ल्याहून आली देवी एकवीराधैर्याचे दान दे गं बाळाला || ५ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ६

सहाव्या दिवशी पाळणा गातामाहूर हून आली रेणुका माताशक्ती चे दान दे गं लेकीला || ६ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ७

सातव्या दिवशी पाणी झाडालासप्तश्रृंगी देवी वणी गडालाप्रेमाने पाही माझ्या बाळाला || ७ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ८

आठव्या दिवशी घाई हो झालीकोल्हापूराची लक्ष्मी आलीमाझ्या लेकीला समृद्धी देई || ८ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ९

नवव्या दिवशी फुलांचा सडामुंबादेवीची आठवण काढाआशिर्वाद दे गं माझ्या लेकरा || ९ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे १०

दहाव्या दिवशी मांढरगावातकाळूबाई ला धाडा निरोपबाळाला माझ्या दीर्घ आयुष्य || १० ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे ११

अकराव्या दिवशी पाळणा सजलाचण्या घुगऱ्यांचा खाऊ हि केलाबारशा ला बोलवा सर्व देवींना || ११ ||

ध्रुवपद:

लेक जन्मली सोहळा करानाजूक परीची दृष्ट तर काढाचंद्र सूर्य तारे ओवाळून टाकाजो बाळा जो जो गं जो || धृ ||

कडवे १२

बाराव्या दिवशी बोलवा माळीकरा आरास लावून केळीनाव 'संतोषी' ऐका मंडळी || १२ ||